Uncategorized

गोरेगाव पोलीस स्टेशनच्या आरोपीना सहकार्य करण्याच्या कृतीबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्याकडे तक्रार…!

गोरेगाव पोलीस स्टेशनच्या आरोपीना सहकार्य करण्याच्या कृतीबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्याकडे तक्रार…!

 (ब्युरो चीफ)सहारा-समय,मराठी:-

पनवेल एसटी स्टॅन्डवरून अपहरण झालेले पत्रकार अपहरण प्रकरणात कोणताच संबंध नसलेल्या रायगड जिल्ह्यातील गोरेगाव पोलिसांच्या आरोपीना सहकार्य करण्याच्या कृतीबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्याकडे तक्रार केल्याने खळबळ माजली आहे.

  समीर बामुगडे रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील रहिवासी असून पत्रकार म्हणून 20 वर्ष कार्यरत आहेत.

वनसंपत्ती प्रकरणात अवैध लाकडांचा व्यापारी असलेल्या विजय काते नावाच्या इसमाने त्याचा स्वतःचा वन अधिकारी असलेला फोटो सोशल मीडियावर टाकलेला त्यांना दिसला. त्यामुळे त्यांनी त्या संदर्भात बातम्या प्रसिद्ध केल्या.

  त्या बातम्यांचा राग येऊन संबंधित लोकांनी त्यांचे दि. 27/6/2025 रोजी पनवेल बस स्टॅन्डवरून अपहरण केले. त्या बद्दल बामुगडे यांनी पनवेल शहर पोलीस स्टेशनमध्ये अपहरण घटने बाबतीत तक्रार दाखल केली. त्याबद्दल नवी मुंबई पोलीस आवश्यक कार्यवाही करत आहेत.

  मात्र या बाबतीत अपहरण प्रकरणात सगळ्या घटना पनवेल ते मंडणगड(दापोली तालुका,रत्नागिरी) यांच्याशी संबंधित आहेत. अपहरण प्रकरणात पोलीस कार्यवाही पनवेलमध्ये सुरु आहे. दरम्यान घटनेतील उत्तम जाधव याला घटनेत सुरक्षित करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील गोरेगाव पोलीस स्टेशन(ज्यांचा घटनेत संबंध नाही, उत्तम जाधव हा देखील मंडणगडचा आहे.) यांनी बामुगडे यांना उत्तम जाधवची तुमच्या विरोधात तक्रार आहे. असं सांगून मला गोरेगाव पोलीस स्टेशनचे श्री. एस एन रासकर यांच्या नावाने तक्रार अर्ज 24/7/2025 चा असून कायदेशीर कारवाईच्या मागणीचा उल्लेख आहे. बामुगडे यांनी त्यांना उत्तम जाधव माझ्या अपहरण प्रकरणात सह-आरोपी आहेत. मी सध्या माझ्या अपहरण प्रकरणात सतत नवीमुंबई, पनवेल फेऱ्या मारत आहे. असे जसं त्यांनी व्हॉइट्सअपवर दिलं तसंच कळवलं .

पत्रकार समीर बामुगडे यांच्या तक्रारीचा उद्देश असा आहे, की उत्तम जाधवचा त्यांच्या घटनेत महत्वपूर्ण सहभाग असल्याने त्याचा पनवेमध्ये तक्रारीत उल्लेख आहे. पण केवळ त्याला वाचवण्यासाठी अथवा सहकार्य करून पनवेल केसच्या तक्रारी पासून रोखण्यासाठी हा प्रकार होत असल्याचे त्यांनी आपल्या अलिबाग जिल्हा मुख्यालय तक्रारीत लिहले आहे.  

  आपण आपल्या स्तरावर याबद्दल चौकशी करावी त्यामुळे जर असं घडत असेल तर चुकीच्या या प्रकाराचा पर्दाफाश होऊ शकेल.असे त्यांनी पोलीस अधीक्षक दलाल यांना कळवले आहे.

Sahara Samay Marathi

1987 पासून आजतागायत सक्रिय पत्रकारिता. दै. कृषिवल मधून पत्रकार म्हणून काम सुरु केली. नंतर दै. मुंबई-सकाळ, दै.लोकसत्ता,दै. सामना, दै.नवाकाळ,दै. पुण्य नगरी आदी राज्यस्तरावर(तेव्हा जिल्हा आवृती नव्हत्या )अनेक वृत्तपत्रात काम केले.सुप्रसिद्ध चित्रलेखा साठी कोकण प्रतिनिधी म्हणून अनेक वर्ष काम केले. सॅटेलाईट चॅनल सुरु झाल्यावर सहारा-समय वृत्तवाहिनी मधून रायगड, नवी मुंबई, पुणे, रत्नागिरी पर्यंत असंख्य विषयांवर स्पॉट पत्रकारिता केली.आजतक, इंडिया टीव्ही असे हिंदी चॅनल तसेच आयबीएन, जय महाराष्ट्र, साम टीव्ही असे मराठी चॅनलमध्ये काम केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!