Uncategorized

अपोलो ने कॅन्सरवरील उपचारांमध्ये महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले

अपोलो ने कॅन्सरवरील उपचारांमध्ये महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले

 

‘लिविंग ड्रग’ उपचार,रिफ्रॅक्टरी बी-सेल लिम्फोमा, बी-सेल लिम्फोब्लास्टिक ल्युकेमियाशी झुंजणाऱ्या रुग्णांना नवीन आशा प्रदान करते

नवी मुंबई, २३ जुलै २०२५ –

अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई

(AHNM) ने भारतात विकसित करण्यात आलेल्या सीएआर टी-सेल थेरपीने दोन रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार केले आहेत. ही एक अभूतपूर्व इम्युनोथेरपी आहे जी रुग्णाच्या स्वतःच्या अनुवांशिकरित्या सुधारित रोगप्रतिकारक पेशींचा वापर करून कॅन्सरला टार्गेट करून नष्ट करते.

 

अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईने ८५ बोन मॅरो ट्रान्सप्लांट (BMT) प्रक्रियांमध्ये उल्लेखनीय यश मिळवले आहे, ज्यांचा दीर्घकालीन यश दर ७०% पेक्षा जास्त आहे, प्रौढ व बाल रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत आणि त्यामध्ये आंतरराष्ट्रीय केसेसचा देखील समावेश आहे. त्यांचे हे यश जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित BMT केंद्रांच्या यश दराशी सुसंगत आहे. अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई येथील कन्सल्टन्ट, हेमॅटोलॉजी, हेमॅटो ऑन्कोलॉजी आणि प्रोग्राम कोऑर्डिनेटर बीएमटी आणि सीएआर टी-सेल थेरपी, डॉ. पुनीत जैन यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणाऱ्या, अलिकडच्या सीएआर टी-सेल प्रक्रिया उच्च दर्जाच्या, जीवनरक्षक प्रत्यारोपण सेवा प्रदान करण्याची रुग्णालयाची वचनबद्धता दर्शवतात.

 

ओडिशाच्या ४९ वर्षीय श्रीमती शर्मा बी-सेल अॅक्यूट लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया नावाच्या हट्टी रक्त कॅन्सरशी झुंज देत होत्या. इम्युनोअॅक्ट लॅबमध्ये त्यांच्या रोगप्रतिकारक पेशी (टी-सेल म्हणतात) काढल्या गेल्या आणि संशोधित केल्या गेल्या जेणेकरून त्या शरीरातील कॅन्सरला चांगल्या प्रकारे ओळखण्यासाठी आणि त्यावर हल्ला करण्यासाठी त्यांच्या पृष्ठभागावरील सुधारित कनेक्टर एक्सप्रेस करतील. श्रीमती शर्मा म्हणाल्या, “थेरपी खूप कठीण होती, परंतु अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई टीमची कौशल्ये आणि पाठिंब्यामुळे मला त्यावर मात करण्यास मदत झाली. आता मी माझ्या भविष्याबद्दल आशावादी आहे,” 

 

दुसरे रुग्ण, मुंबईचे रहिवासी, ५७ वर्षांचे श्री दास यांना फॉलिक्युलर लिम्फोमा झाला होता. हा एक प्रकारचा रक्त कॅन्सर आहे, ज्याने केमोथेरपी आणि रेडिएशनसह अनेक उपचारानंतर पुन्हा डोके वर काढले होते. त्यांच्या रोगप्रतिकार पेशींना (ज्यांना टी-पेशी म्हणतात) एकत्र करून संशोधित केले गेले आणि जून २०२५ मध्ये त्यांना सीएआर टी-पेशी थेरपी दिली गेली. त्यांना ताप आला पण औषधे दिल्यावर त्यांची तब्येत बरी झाली आणि काही आठवड्यांनी त्यांना घरी पाठवून दिले गेले. श्री शिवदास म्हणाले, “अनेक उपचार व अपयशांनंतर या नवीन थेरपीने मला पुन्हा एकदा आशेचा किरण दिसू लागला. ही केवळ एक सुरुवात आहे पण डॉक्टरांच्या समर्थनाने मला प्रेरणा दिली आणि मला खात्री आहे की, मी बरा होईन.”

डॉ पुनीत जैन, कन्सल्टन्ट, हेमॅटोलॉजी, हेमॅटो ऑन्कोलॉजी आणि प्रोग्राम कोऑर्डिनेटर बीएमटी आणि सीएआर टी-सेल थेरपी, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई यांनी माहिती दिली,”पारंपरिक उपचारांनंतर पुन्हा आजारी पडलेल्या रक्त कॅन्सरच्या रुग्णांसाठी सीएआर टी-सेल थेरपी नव्या शक्यता घेणं आली आहे. आक्रमक किंवा उपचारांना दाद न देणाऱ्या कॅन्सरच्या रुग्णांना ही थेरपी संपूर्ण उपचारांची आशा प्रदान करते. आम्ही आव्हानात्मक, खूप जास्त धोका असलेले बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट यशस्वीरीत्या करत आहोत आणि सीएआर टी-सेल प्रक्रिया केल्या जाणाऱ्या रुग्णांना प्रगत, पुराव्यांवर आधारित ऊफकर प्रदान करण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहोत.”

 

श्री अरुणेश पुनेथा, सीईओ-पश्चिम क्षेत्राचे रीजनल, अपोलो हॉस्पिटल्स यांनी सांगितले,”अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईमध्ये सीएआर टी-सेल केसेसमध्ये मिळत असलेले यश आज भारतात प्रगत कॅन्सर देखभाल प्रदान करण्याच्या आमच्या बांधिलकीचे एक उदाहरण आहे. अपोलो समूहातील इतर अनेक हॉस्पिटल्समध्ये देखील सीएआर टी-सेल प्रक्रिया यशस्वीपणे केल्या जात आहेत. रुग्णांना सर्वोच्च दर्जाची देखभाल प्रदान करण्याच्या आमच्या क्षमता यामध्ये दर्शविल्या गेल्या आहेत. या प्रक्रियांसाठी कुशल क्लिनिशियन्स आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांबरोबरीनेच संसर्ग नियंत्रणाच्या काटेकोर प्रोटोकॉलसहित एक डेडिकेटेड युनिट देखील आवश्यक असते. विशेष उपचार आणि देखभाल मिळवू इच्छिणाऱ्या रुग्णांसाठी आज अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई आशेचा किरण बनत आहे.”

Sahara Samay Marathi

1987 पासून आजतागायत सक्रिय पत्रकारिता. दै. कृषिवल मधून पत्रकार म्हणून काम सुरु केली. नंतर दै. मुंबई-सकाळ, दै.लोकसत्ता,दै. सामना, दै.नवाकाळ,दै. पुण्य नगरी आदी राज्यस्तरावर(तेव्हा जिल्हा आवृती नव्हत्या )अनेक वृत्तपत्रात काम केले.सुप्रसिद्ध चित्रलेखा साठी कोकण प्रतिनिधी म्हणून अनेक वर्ष काम केले. सॅटेलाईट चॅनल सुरु झाल्यावर सहारा-समय वृत्तवाहिनी मधून रायगड, नवी मुंबई, पुणे, रत्नागिरी पर्यंत असंख्य विषयांवर स्पॉट पत्रकारिता केली.आजतक, इंडिया टीव्ही असे हिंदी चॅनल तसेच आयबीएन, जय महाराष्ट्र, साम टीव्ही असे मराठी चॅनलमध्ये काम केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!