Uncategorized

श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्यातील सरकारी जंगलात खैर झाडाची अवैधरित्या तस्करी ,पोलीस आणि टोळी यांच्या युतीमुळे शासकीय वनसंपदेचा अपहार..?

श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्यातील सरकारी जंगलात खैर झाडाची अवैधरित्या तस्करी ,पोलीस आणि टोळी यांच्या युतीमुळे शासकीय वनसंपदेचा अपहार..?

 

रायगड/विशेष प्रतिनिधी :-

 

मंडणगड परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत खैर झाडांची तस्करी करणाऱ्या टोळीचा रायगड जिल्ह्यात उघडपणे अवैध व्यापार सुरू आहे.या टोळीचा मोर्चा रायगड जिल्ह्यातील म्हसळा, श्रीवर्धन, माणगाव, पाली, रोहा आदी तालुक्यांकडे वळला आहे. या भागांतील खैर जातीची झाडं चोरून, गोरेगाव-आंबेत मार्गे रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगडमध्ये नेली जात आहेत. या मार्गावर आंबेत पोलिस नाका गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. त्यामुळे टोळी गोरेगाव पोलिसांना महिन्याचे मोठ्या रक्कमेचे हप्ते देऊन हे धंदे उघडपणे करत असल्याची पक्की माहिती समोर आली आहे.कारण यापूर्वी देखील याच टोळीविरोधात या ठिकाणी कारवाई झालेल्या आहेत.

  मात्र या टोळीचा स्थानिक पोलीसांवर इतका प्रभाव आहे की, त्यांच्याकडूनच आता कसे ही गुन्हे दाखल करून घेतले जातात हे विशेष. याकरिता त्यांच्या टोळीतील महिला किंवा पुरुषांनी कुठे ही एखादी साधी तक्रार दिली, तरी पोलीस स्टेशनमधून त्यांना हवी तशी कलमं लावून लगेच गुन्हा दाखल होतो.   

  उलट, इतर कुणी पीडित नागरिकांनी कुठल्याही तक्रारीसाठी पोलिसांकडे गेल्यास त्यांची दखलही घेतली जात नाही. उलट त्यांना चौकशीसाठी अनेक दिवस ताटकळत ठेवले जाते. ही बाब अत्यंत गंभीर असून पोलिस प्रशासनातील अशा वर्तनाचा वरिष्ठ पोलीस प्रशासनाने याची नोंद घेणं अत्यावश्यक आहे . 

  गोरेगाव पोलीस ठाणे हे पोलीस निरीक्षक पदाच्या अधिकाराऐवजी फक्त सहायक पोलीस निरीक्षकाच्या अखत्यारीत चालते. त्यामुळे या ठाण्यात रोजच आर्थिक व्यवहारांचे पीक भरते आहे.असा अनुभव सगळ्यांना मिळत असतो. आंबेत पोलिस चौकीच्या हद्दीतून रोजच्या रोज खैर झाडांची वाहतूक होत असते. सूत्रांकडून प्रत्येक गाडीला पास करण्यासाठी ठराविक दर लावले गेले आहेत. टोळीच्या कृपेने हा सगळा व्यवहार पोलिसांच्या आशीर्वादाने सुरळीत पार पडतो असे कळते.

   विशेषतः या अगोदर ही या टोळीमार्फत काही निष्पाप लोकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्यांतील पोलिस नाक्यांवरून रात्री अपरात्री खैर झाडांची वाहतूक चालू असते. हे देखील स्थानिक नागरिकांनी निदर्शनास आणले आहे.

  सूत्रांच्या खात्रीशीर माहिती प्रमाणे लाकडाच्या अवैध धंद्यातील “काते टोळीचा” म्होरक्या विजय सिताराम काते हाच सरकारी जंगलातला म्हसळा आणि श्रीवर्धन तालुक्यातील चोरी करुन नेतो. याच्यावर यापूर्वी ही काही वनगुन्हे दाखल आहेत. चार महिन्यापूर्वीच माणगाव वनक्षेत्रपाल याच्याकडे उपवनसंरक्षक रोहा यानी तपास दिला असताना माणगाव वनक्षेत्रपाल यांनी तपास हलगर्जीपणा केल्याचे दिसून आले आहे.

  या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी आता तरी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी व या भ्रष्ट पोलिसांविरुद्ध तात्काळ कारवाई करावी, अशी अपेक्षा सामान्य जनतेकडून व्यक्त होत आहे. वन्यप्रेमी नागरिकांच्या म्हणण्यानुसार तसं न केल्यास जंगलाचे नुकसान आणि सामान्य नागरिकांचे शोषण हे असेच चालू राहील.

Sahara Samay Marathi

1987 पासून आजतागायत सक्रिय पत्रकारिता. दै. कृषिवल मधून पत्रकार म्हणून काम सुरु केली. नंतर दै. मुंबई-सकाळ, दै.लोकसत्ता,दै. सामना, दै.नवाकाळ,दै. पुण्य नगरी आदी राज्यस्तरावर(तेव्हा जिल्हा आवृती नव्हत्या )अनेक वृत्तपत्रात काम केले.सुप्रसिद्ध चित्रलेखा साठी कोकण प्रतिनिधी म्हणून अनेक वर्ष काम केले. सॅटेलाईट चॅनल सुरु झाल्यावर सहारा-समय वृत्तवाहिनी मधून रायगड, नवी मुंबई, पुणे, रत्नागिरी पर्यंत असंख्य विषयांवर स्पॉट पत्रकारिता केली.आजतक, इंडिया टीव्ही असे हिंदी चॅनल तसेच आयबीएन, जय महाराष्ट्र, साम टीव्ही असे मराठी चॅनलमध्ये काम केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!