Uncategorized

पत्रकार अपहरण प्रकरणात पनवेल पोलीसांचा अजूनही शून्य तपास

नकली वन अधिकारी बातम्या प्रकरणात रायगड जिल्ह्यातील पत्रकार समीर रामा बामुगडे यांचे पनवेल बस स्टॅन्ड वरून काही अपराधी प्रवृत्तीच्या मंडळींनी बातमीच्या वादावरून दि. 27/6/2025 रोजी रोहा-पनवेल बसमधून उतरताना सकाळी 9:45 वाजता पनवेल स्टॅन्ड वरून अपहरण केले.त्यांना रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड पोलीस स्टेशन पर्यंत नेल्याने सुदैवाने त्या मधून ते जिवंत घरी परतले.याबाबतीत पनवेल पोलिसांनी कोणताच तपास तीन आठवडे उलटून देखील न केल्याने याबद्दल सखेद आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
   घटनेची तक्रार त्यांनी पनवेल शहर पोलीस स्टेशनमध्ये दि. 28/6/2025 रोजी साधारण 12:30 वाजता रीतसर नोंदवली. त्यांचा जवाब देखील नोंदवण्यात आला. मात्र आजतागायत संबंधित अपहरणकर्ते आरोपीना (साधारण 10-12 जण आहेत) साधी अटक किंवा याबद्दल एफ.आय.आर देखील दाखल करण्यात आली नाही.
   समीर बामुगडे यांनी तक्रार नोंदवताना त्यांच्या जीवाला या सगळ्या मंडळींकडून धोका आहे. असे स्पष्ट म्हटले असतांना अपहरण करणाऱ्यांचाच भावनिक विचार या तपास कामात होतोय, फिर्यादीला पोलिसांत येऊन ही असुरक्षित वाटतेय. हा विचित्र विरोधाभास दिसतोय.
  आता पत्रकार सुरक्षा समिती, महाराष्ट्र राज्य संघटनेतर्फे नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांना आपण नवी मुंबई विभागाचे पोलीस प्रशासन प्रमुख म्हणून व्यक्तिशः लक्ष घालून या प्रकरणी न्याय्य कार्यवाही करावी अशी मागणी पत्रकार सुरक्षा समितीने केली आहे.

Sahara Samay Marathi

1987 पासून आजतागायत सक्रिय पत्रकारिता. दै. कृषिवल मधून पत्रकार म्हणून काम सुरु केली. नंतर दै. मुंबई-सकाळ, दै.लोकसत्ता,दै. सामना, दै.नवाकाळ,दै. पुण्य नगरी आदी राज्यस्तरावर(तेव्हा जिल्हा आवृती नव्हत्या )अनेक वृत्तपत्रात काम केले.सुप्रसिद्ध चित्रलेखा साठी कोकण प्रतिनिधी म्हणून अनेक वर्ष काम केले. सॅटेलाईट चॅनल सुरु झाल्यावर सहारा-समय वृत्तवाहिनी मधून रायगड, नवी मुंबई, पुणे, रत्नागिरी पर्यंत असंख्य विषयांवर स्पॉट पत्रकारिता केली.आजतक, इंडिया टीव्ही असे हिंदी चॅनल तसेच आयबीएन, जय महाराष्ट्र, साम टीव्ही असे मराठी चॅनलमध्ये काम केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!